ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला फौजदार; आई-वडिलांनी ऊसतोडीवर उचल घेऊन घेऊन दिली होती पुस्तके

www.careernama.com 9 1

करिअरनामा ऑनलाईन | कितीही गरिबी घरात असली तरी काही तरुण स्वप्न पाहायचे सोडत नाहीत. असेच एक स्वप्न एका तरुणाने पाहिले. आणि फौजदार झाला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपक झाला फौजदार! आणि तिने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. रूमवरील मुले झोपल्यावर त्यांची पुस्तके घेऊन, तर दैनिके वाचनासाठी चहाच्या टपरीवर जाऊन दीपकने अभ्यास पूर्ण केला. आज लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत त्याची फौजदार म्हणून नियुक्ती झाली आहे. दीपक प्रकाश वाघ असे फौजदार झालेल्या कन्नड तालुक्यातील कानडगावच्या युवकाचे नाव आहे. आई-वडिलांची प्रबळ इच्छा होती की, आपल्या मुलांनी काही तरी शिकून मोठे व्हावे.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

परिस्थिती विपरीत होती. ऊसतोड करून उसाचे वाढे विकून संसाराचा गाडा सांभाळत त्यांनी मुलाला शिकवले. मुलगा पहिल्याच प्रयत्नात पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाला. दीपकचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. दहावीला दीपक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यामुळे दीपककडून आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पुढील शिक्षणासाठी दीपकला औरंगाबादला पाठवण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याला पाठवण्यासाठी पैसे नसल्याने गावातील ऊसतोडणीच्या मुकादमाकडून पैसे घेतले व दीपकने औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. वाचन व लिखाणाची आवड असल्याने दीपक बारावी, बीएला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मग त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरात पैसे नसल्याने पालकांनी पुन्हा मुकादमाकडून उचल घेतली व दीपकच्या परीक्षेची फीस भरली. दीपकने केवळ फीसचे पैसे आई-वडिलांकडून घेतले होते.

स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी वाचनालयात बसण्यासाठी व पुस्तकासाठी पैसे नसल्याने रूममधील सहकारी झोपल्यावर रात्री त्यांची पुस्तके घेऊन दीपक रात्रभर अभ्यास करत असे. चहाच्या हॉटेलवर येणारी सर्व वर्तमानपत्रे तो तिथेच वाचत असे. अशा परिस्थितीत दिवसभर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करत एमपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. दीपकची ही कहाणी खरोखरच डोळ्यात पाणी आणणारी आहे. पोलिस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न होते. शिकत असताना मी त्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्या पालकांनी केलेल्या कष्टांचे चीज झाले. पालकांचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, असे दीपक म्हणाला. तर दीपक लहानपणापासून आशावादी होता. त्याला जे करायचे त्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे. आम्ही ऊसतोड करून त्याला शिकवले. आज आमच्या कष्टांचे चीज झाले, असे त्याचे वडील म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment