वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग, दिल्ली (DEA) येथे इंटर्नशीपची संधी

Finance Ministry

करिअरनामा ऑनलाईन | DEA ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाबींवर परिणाम करणारे देशातील आर्थिक धोरणे आणि कार्यक्रम व्यवस्थापित करणारी केंद्र सरकारची आर्थिक व्यवहार विभाग ही एक नोडल एजन्सी आहे. या विभागात इंटर्नशिपची संधी आहे.

इंटर्नशिप बद्दल:

आर्थिक व्यवहार विभाग हा उमेदवारांना इंटर्नशिप अंतर्गत भांडवली बाजारपेठ, आर्थिक सुधारणा, विनिमय व्यवस्थापन, भारतातील परदेशी गुंतवणूक आणि भारताची परदेशातील गुंतवणूक, आर्थिक धोरण, वित्तीय धोरण, चलनवाढ व्यवस्थापन, पायाभूत सुविधा इ. चा अभ्यास करण्यास प्रवृत्त करते.

इंटर्नशिपचे योजनेचे उद्दीष्ट निवडलेल्या उमेदवारांना मॅक्रो स्थरावर सरकारची आर्थिक धोरणे तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस परिचित करणे आहे.

देशासमोर असणाऱ्या आर्थिक समस्येवर संशोधन करणे आणि त्यावर उपाय सुचवणे हे या इंटर्नशिपचे अजून एक उद्धिष्ट आहे.

कालावधी:

इंटर्नशिपचा कालावधी हा 3 महिन्यांपेक्षा कमी नसेल. जे उमेदवार 6 महिने थांबू शकतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. कालावधी खूप कमी असल्यामुळे उमेदवाराने खूप गहन अभ्यास करणे आवश्यक आहे.

जबाबदाऱ्या:

इंटर्नशिप संपल्यावर वाटप झालेल्या विषयाचा अहवाल हा संबंधित विभाग प्रमुखकडे सादर करावा लागतो. त्याचबरोबर त्यांचा अहवाल सादर केल्यावर कार्यक्रमाच्या त्यांच्या अनुभवाचा अभिप्राय एचओडी ला देने आवश्यक आहे.

पात्रता:

उमेदवार हा अर्थशास्त्रात NIRF नुसार टॉप 25 विद्यापीठातून किंवा इन्स्टिट्यूट मधून पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा Ph. D करणारा असावा.

मानधन:

PG इंटर्न-10000 दरमहा
Ph.D. इंटर्न- 20000 दरमहा

अर्ज कसा करावा?

अर्जदाराने वित्त मंत्रालयाच्या https://mofapp.nic.in/DEA_Internship/Public/ApplicantRegister.aspx लिंकवर नोंदणी करावी आणि त्यांच्या अर्जात सूचित करावे-
1) त्यांचे आवडते क्षेत्र
2) त्यांच्या उपलब्धतेच्या तारखा/महिना
3) त्यांच्या पसंतीचे 3 विषय ज्यावर ते त्यांची इंटर्नशिप करू इच्छिता.

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment