Breaking News : 10 वी चे निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे करणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सुचक विधान

Independent channel of Balbharati

मुंबई । राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे या काळात परीक्षा घेणे योग्य राहणार नाही. म्हणूनच महा विकास आघाडी सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांना देखील या संदर्भात विनंती केली होती की आपणही आपल्या परीक्षा संदर्भात निर्णय घ्यावा. त्यानुसार सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र शासन आणि महाविकास आघाडीचे मुलांची आरोग्य आणि सुरक्षा हीच सर्वात पहिली प्राथमिकता आहे. सीबीएससीने ज्याप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेसमेंट चा निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे आम्ही तज्ञांशी बोलून विचार करू’ अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/138224944706993767

Leave a Comment