Breaking News : 10 वी 12 वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

www.careernama.com 2021 01 20T082230.733

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापूर्वी एमपीएससी तसेच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता वैद्यकीय परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.  या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, असे ट्वीट अमित देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, यापूर्वीच दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment