CBSE 10th Result 2021 | CBSE SSC Result 2021 दहावीच्या निकालाची तयारी सुरू

CBSE CET 2019

CBSE SSC Result 2021 : The Central Board of Secondary Education (CBSE) has prepared a plan for internal evaluation of 10th standard students and the results will be announced after evaluating the students (CBSE 10th Result 2021) as per the guidelines given in the plan.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाची तयारी सुरू केली आहे. बोर्डाने ई-परीक्षा पोर्टलवर एक लिंक अॅक्टिव्ह केली आहे. निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डांतर्गत येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल (CBSE 10th Result 2021) जाहीर करण्यात येणार आहेत. या निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या विविध ऑनलाइन परीक्षा प्रकारांसाठी विशिष्ट गुण नमूद करण्यात आले आहेत.

सीबीएसईचा मूल्यमापन आराखडा दृष्टिक्षेपात

१. निकालासाठी प्रत्येक शाळेची सात शिक्षकांची समिती
२. सातपैकी दोन शिक्षक इतर शाळांमधील असणे बंधनकारक
३. मू्ल्यमापन करताना चाचणीला १०, सहामाहीला ३० तर पूर्व परीक्षेला ४० मार्कांचा अधिकतम दर्जा
४. एकूण ८० गुणांचे मूल्यमापन


CBSE च्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

CBSE SSC Result 2021 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने निकष जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत अंतर्गत मूल्यांकन करून त्या आधारावर दहावीचे निकाल दिले जाणार आहेत.

20 जूनपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे नियोजन CBSE कडून करण्यात आले आहे. देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मे महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 20 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे शाळेत मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन केली जाणार असून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

असे असेल 80 गुणांचे विभाजन

चाचणी परीक्षा- 10 गुण

सहामाही परीक्षा- 30 गुण

सराव परीक्षा- 40 गुण

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment