MIMH Pune Recruitment 2021 | महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mimhpune.org

एकूण जागा – 10

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मनोविकृती चिकित्सक वर्ग-1 – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमडी (मानसोपचार) किंवा एमडी (औषध) सह डिप्लोमा 02. एमडी असल्यास किमान 03 वर्षाचा अनुभव

2.अधिव्याख्याता मनोविकृती सामाजिक कार्य – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून समाज कार्य / समाजशास्त्र / उपयोजित समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. 02. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. फील. मनोविकृती सामाजिक कार्य ही पदवी. 03. मनोरूग्णालय, बाल मार्गदर्शन क्लिनिक किंवा सामान्य रूग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभाग येथे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता म्हणून 3 वर्षाचा शिकविण्याचा आणि संशोधनाचा अनुभव असावा. 04.उमेदवाराने संगणक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले “संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र” धारण करणे आवश्यक. 05. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

3.अधिव्याख्याता क्लिनिकल सायकॉलॉज – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. 02. भारतीय पुनर्वास परिषद मान्य व मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. फिल चिकित्सा मानसशास्त्र ही पदवी. 03. उमेदवार RCIAct १९९२ नुसार Clinical Psychologist म्हणून नोंदणीकृत असावा. 04. उमेदवाराने संगणक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले “संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र” धारण करणे आवश्यक. 05. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

4.अधिव्याख्याता जीवसंख्याशास्त्र – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सांखिकी/जीवसंख्याशास्त्र / जीवनमानशास्त्र या विषयातील एम.एस्सी. पदवी. 02. जीवसंख्याशास्त्र वा तत्सम पदावर 3 वर्षांचा अनुभव, 03. पी.एच.डी. पदवी आणि संशोधनाचा अनुभव असल्यास प्राधान्य

5.समोपदेष्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सांविधीक विद्यापीठाची मनोविकृतीचिकित्सा या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असेल आणि 02. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेचा एक वर्षाचा समोपदेष्टा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असेल किंवा अ” मध्ये नमूद केलेली अर्हता प्राप्त केल्यानंतर मानसिक आरोग्यामधील समुपदेशनाचा किमान 5 वर्षांचा अनुभव संपादन केलेला असेल

6.सहाय्यक ग्रंथपाल – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. लिब.पदवी उत्तीर्ण व अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

7.कनिष्ठ लिपिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सांविधीक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंव शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता. 02. मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रती मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनीट 03. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – 35 ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.मनोविकृती चिकित्सक वर्ग-1 – 15,600/- to 39,100/-

2.अधिव्याख्याता मनोविकृती सामाजिक कार्य – 9300/- to 34,800/-

3.अधिव्याख्याता क्लिनिकल सायकॉलॉजी – 9300 to 34,800/-

4.अधिव्याख्याता जीवसंख्याशास्त्र – 9300/- to 34,800/-

5.समोपदेष्ट- 9300/- to 34,800/-

6.सहाय्यक ग्रंथपाल – 9300-/ to 34,800/-

7.कनिष्ठ लिपिक – 5200/- to 20,200/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे –

अधिकृत वेबसाईट – www.mimhpune.org

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment