MPSC Bharti 2021 | नवीन अपडेट – सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती!

mpsc img

MPSC Bharti 2021 : The Maharashtra State Public Service Commission (MPSC) has agreed to conduct all types of recruitment of the State Government through itself. Further details are as follows:-

नवीन अपडेट – सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती! सर्व प्रकारची नोकरभरती करण्याची आपली तयारी आहे का, अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एमपीएससीकडे करण्यात आली होती. त्यावर एमपीएससीने सहमती दर्शविणारे पत्र विभागाला पाठविले आहे. राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकरभरती स्वत:मार्फत करण्यास महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सहमती दर्शविली आहे.

सरकारने पारदर्शक नोकरभरतीसाठी अराजपत्रित अधिकारी (ब) तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही एमपीएससीमार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड एमपीएससीमार्फत केली जाते.  अराजपत्रित ब, क आणि ड यांची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जाते. ही भरती निवड मंडळांऐवजी एमपीएसीमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या संवर्गांची नोकर भरती एमपीएससीमार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते.

दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त असतात. या मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलिकडेच तीन कंपन्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली होती. मात्र, आता विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारितील निवड प्रक्रिया एमपीएससीकडे देण्याचे प्रस्तावित आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


नवीन अपडेट – MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी!

MPSC Bharti 2021: Due to Corona, Maharashtra Public Service Commission exams were postponed. Now the second wave of the corona has pushed a paper of students forward. However, in the 2021 recruitment, these students who have reached the age limit will be given a chance.

नवीन अपडेट – MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी! कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

MPSC Bharti 2021

काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.


Maharashtra Public Service Comission Bharti 2021 – MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Bharti 2021 : The Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination to be held on Sunday 11th April has been postponed. The decision was taken at an emergency meeting convened by Chief Minister Uddhav Thackeray.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC exam postponed) घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केल्याचे समजते. थोड्याचवेळात यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. तेव्हा राज्य सरकार MPSC परीक्षेची पुढची तारीख आत्ताच जाहीर करणार का, हे बघावे लागेल.


MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल!!

MPSC Bharti 2021 : Three examination sub-centers in Pune have been shifted for the MPSC Secondary Service Joint Pre-Examination organized by the Maharashtra Public Service Commission. A press release was released on the website on Thursday. 

नवीन अपडेट – MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल!! – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीने पुणे जिल्हा केंद्रावरील तीन परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आले.

वाघोलीतील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. तसेच अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा नºहे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे होणार आहे.


MPSC Recruitment 2021- MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

MPSC Bharti 2021 : As per the decision of Maharashtra Commission, MPSC competitive examination will be held as per schedule. There is comforting news for millions of students preparing for the MPSC exams. The examination will be conducted in the corona’s background following proper precautions and rules.

महत्त्वाचे – MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. महाराष्ट्र आयोगाच्या निर्णयानुसार MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं.

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.

या संदर्भातील अधिक आम्ही लवकरच प्रकाशित करू…


महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 – महत्त्वाच्या सूचना

MPSC Bharti 2021 : Highlights have been announced for the candidates for the Maharashtra Engineering Service Pre-Examination 2020 conducted under the Maharashtra Public Service Commission. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 परीक्षेबाबत उमेदवारांकरिता ठळक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेबाबत संपूर्ण ठळक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

 • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020
 • परीक्षेची तारीख27 मार्च 2021

MPSC Bharti 2021


MPSC Recruitment – MPSC च्या वन, कृषी, अभियांत्रिकी या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार! 

MPSC Bharti 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्‍तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्‍वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.

“एमपीएससी’च्या एकत्रित परीक्षेचे स्वरूप

शंभर प्रश्‍नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील. आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. दोन गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्‍के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.


MPSC 2021 -सर्व भरती परीक्षा MPSC मार्फत- लवकरच निर्णय !

फडणवीस सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टलद्वारे गट- क पदांची भरती करण्यात आली. त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आणि विद्यार्थ्यांनी पोर्टल रद्दसाठी आंदोलने केली. महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर या संवर्गातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे तशी मागणी करीत पत्र दिले आहे. त्यानुसार आता निर्णय अंतिम टप्प्यात आला असून सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर गट-क संवर्गातील पदांची भरती केंद्रीभूत पध्दतीने घेण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्था व विद्यार्थी संघटनांनी सरकारकडे केली. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मकता दर्शविली असून त्यावर उद्या (मंगळवारी) मुख्य सचिव संजीवकुमार यांनी बैठक बोलावली आहे.

राज्य सरकारच्या प्रमुख 48 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामध्ये शिक्षण, गृह, जिल्हा परिषद, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास, कृषी अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. त्यातील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. तसेच बृहन्मुंबई व बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पदभरती आयोगाच्या माध्यमातूनच केली जाते. दुसरीकडे तमिळनाडू, गुजरात आयोगातर्फे गट-क संवर्गातील तर केरळ आयोगाच्या माध्यमातून सहकारी बॅंकांचे अधिकारी, अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापकांच्या पदांसह गट- कमधील सर्वच पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने होकार दर्शविला असून आता त्याअुषंगाने बदल करण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तत्पूर्वी, सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील गट-क संवर्गातील पदांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे.

नियमात ‘असे’ करावे लागणार बदल…

 • पदभरतीच्या नियमांमध्ये बदल करुन भरती प्रक्रियेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला काढावे लागेल नवा अध्यादेश
 • गट-अ व ब संवर्गाच्या मागणीपपत्रानुसारच गट-क संवर्गातील पदभरतीची मागणीपत्रे द्यावी लागतील आयोगाला
 • सेवा प्रवेश नियमात बदल करुन गट-क प्रवर्गातील उमेदवारांच्या भरतीची तरतूद अधिनियमात करावी लागेल
 • भरती प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, वशिलेबाजीला लगाम घालण्याच्या दृष्टीने आयोगातर्फेच होईल पदभरती
  होतकरु, गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, कोणत्याही प्रकाराचा गैरप्रकार टाळण्यासाठी घेतला जातोय निर्णय

मोठी बातमी ! एमपीएससीच्या पदभरतीस ‘वित्त’ची मंजुरी; वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना वाढीव संधी?

MPSC Bharti 2021: कोरोनामुळे यंदा राज्याच्या उत्पन्नात एक लाख कोटींहून अधिक रुपयांची तूट आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शासकीय रिक्‍तपदांची संख्या आता अडीच लाखांवर पोहचली आहे. तरीही सार्वजनिक आरोग्य, मेडिकल आणि गृह विभागाच्या पदभरतीस वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदभरतीसही मान्यता दिली आहे.

MPSC Bharti 2021

राज्य सरकारच्या 28 प्रकारच्या शासकीय विभागांमधील गट अ आणि ब प्रवर्गातील पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. कोरोना आणि मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे मागच्या वर्षीय एकही पदाची भरती होऊ शकली नाही. आता मार्च-एप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसह चार प्रकारच्या परीक्षा होणार आहेत. दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करुनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍तपदांच्या 50 टक्‍के पदभरती केली जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले. मात्र, कोरोनाचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर झाला आणि मेगाभरती लांबणीवर पडली. मात्र, राज्यातील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त झाली आहेत. तीन-साडेतीन वर्षांपासून न भरलेली पदे आता अडीच लाखांवर पोहचली आहेत. त्यामुळे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना दमछाक होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगातर्फे राज्यसेवेच्या माध्यमातून आता वित्त विभागाने गटविकास अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, भूमि अभिलेख उपअधिक्षक, महिला व बालकल्याण अधिकारी अशा 28 विभागांमधील पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव डी. एस. करपते यांनी सांगितले.


Maha Jyoti MPSC Pre Training Registration: 

MPSC Bharti 2021 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे कार्यरत असून Maharashtra Public Service Commission (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या “महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा” या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष, मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील मण्यात प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

MPSC Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
pdf जाहिरात/ नोंदणी : http://bit.ly/2Ne9ppS

MPSC Tentative Schedule – MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व  सद्यस्थिती जाहीर

MPSC Bharti 2021: महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा परीक्षा 2020, दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2020, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020, इत्यादी अशा सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व  सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भाती अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

सन 2020 मधील MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व  सद्यस्थिती जाहीर 

MPSC Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
pdf PDF जाहिरात : http://bit.ly/3pFXRKA

MPSC अनाथ आरक्षणासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करा अर्ज ! 

MPSC Bharti 2021 अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरिता शासन निर्णय, महिला व बाल विकास्विभाग, केनांक: अमुजा २०१९/प्र. र. २१२/ का-३, दिनांक 2 एप्रिल, 2018 अन्वये शिक्षण व नोकरी यामध्ये अराखीव (खुला) प्दान्न्मुधून 1% समांतर आर्स्कःक लागू करण्यात आले आहे. MPSC अनाथ आरक्षणासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. या संदर्भातील अधिक करिता कृपया PDF जाहिरात बघावी.

MPSC Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
pdf PDF जाहिरात : http://bit.ly/3iWaBtZ

मराठा आरक्षणासंदर्भात MPSC ची सुप्रीम कोर्टातील याचिका मागे 

MPSC Bharti 2021: maratha reservation mpsc withdraw application in sc on maratha quota – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. या याचिकेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भरती प्रक्रिया रखडली होती; पण ९ सप्टेंबरच्या आधी आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये राज्य सरकार न्यायालयात त्यांना सहकार्य करणार होते. मात्र, त्याआधीच आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गांतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.

या याचिकेबाबत राज्यात तीव्र पडसाद उमटले. एकीकडे मराठा आरक्षण टिकविण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असताना, राज्य लोकसेवा आयोगाने सरकारच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेतली. याबद्दल राज्य सरकारने संताप व्यक्त केला होता. त्यामुळे गुरुवारी राज्य लोकसेवा आयोगाने राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य विभाग यांना पत्र पाठवून सर्वोच्य न्यायालयातील अर्ज मागे घेत असल्याचे कळवले. ‘आयोगाची निवड प्रक्रिया प्रलंबित आहे. याबाबत निर्देश मिळण्याबाबत राज्य सरकारकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण सरकारकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे न्यायालयाकडून आदेश प्राप्त करण्यासाठी आयोगाने अर्ज केला,’ असे आयोगाने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. आर्थिक दुर्बल घटकाचा लाभ मराठा उमेदवारांना मिळावा, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असेही स्पष्ट केले आहे.

परिपत्रकात काय आहे?

राज्य सरकारकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी लागू केलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. या आदेशामुळे आयोगाच्या विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेल्या निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य निर्देश प्राप्त होण्यासाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ अनुज्ञेय ठरवण्याबाबत २३ डिसेंबर रोजी सरकारकडून निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

सोर्स : म. टा.


खुशखबर – MPSC जुलै- ऑगस्टमध्ये होणारी ‘ही’ मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन 

MPSC Bharti 2021 : MPSC Online Examination 2021 – The commission has decided to conduct the upcoming main exam online. The first experiment will be conducted through the Engineering Service Examination to be held in July-August. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजनानुसार आता 14 मार्च, 27 मार्च आणि 11 एप्रिलला राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, आता निकाल वेळेत लागावा, एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून आयोगाने आगामी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले आहे. जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून पहिला प्रयोग केला जाणार आहे.

30 हजार पदे रिक्‍त, तरीही मागणीपत्रे नाहीत

राज्यातील सुमारे 28 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सप्टेंबरपासून त्यांच्याकडील रिक्‍त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली जाते. त्यानुसार आयोगाकडून परीक्षांचे नियोजन होते. राज्यातील विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त असून त्यात प्रथम व द्वितीय श्रेणीतील 30 हजारांहून अधिक पदे आहेत. मात्र, यंदा कोणत्याही विभागाने आयोगाला मागणीपत्र दिले नसल्याने या वर्षातील परीक्षा पुन्हा विलंबानेच होतील. आयोकडून मागणीपत्रासाठी पाठपुरावा सुरु आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी आणि मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेली स्थगिती, यामुळे राज्य सरकारने रिक्‍त पदांची मागणीपत्रे दिली नसल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘एमपीएससी’तर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहायक, दुय्यम निरीक्षक (संयुक्‍त सेवा परीक्षा, गट- क) अशा परीक्षा घेतल्या जातात. राज्यभरातील सुमारे 30 लाखांपर्यंत विद्यार्थी या परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना आयोगाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, त्याची तपासणी आणि निकालासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑफलाइन होत असल्याने परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालासाठी चार- सहा महिन्यांचा कालावधी जातो. या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येते. आता आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहावेळाच परीक्षा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. सुरवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षेत हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करुन आगामी सर्वच मुख्य परीक्षा ऑनलाइन होतील, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


MPSC Exams Revised Dates – MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

MPSC Bharti 2021 : MPSC Exams Revised Dates – The Maharashtra Public Service Commission has announced the revised dates for the competitive examinations to be held in the year 2020. Following the decision taken to postpone the above 3 examinations held in the year 2020, these examinations are being scheduled on the date indicated in front of their names as follows. Further details are as follows:-

MPSC Exams Revised Dates  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आलेले आहेत. सन 2020 आधील आयोजित उपरोक्त 3 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास नियोजित करण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

परीक्षेचे नाव

 • राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2020
Important Links For MPSC Exams Revised Dates
pdf PDF जाहिरात : http://bit.ly/2LFxTri
Apply अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या  जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले  आहे.


MPSC Exams Date Announcement

MPSC Bharti 2021 – The Maharashtra Public Service Commission exams, which have been stalled for over a year due to corona, will now be held in March. According to the information received, the Maharashtra Public Service Commission has taken a decision in this regard and the official announcement about the dates of the exams is likely to be made today. The state service pre-examination will be held in the second week of March and the engineering pre-service examination will be held in the third week, sources said.

MPSC Exams Date Announcement : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्चमध्ये होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत निर्णय घेतला असून आज परीक्षांच्या तारखांबद्दल आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांना विलंब झाला आहे. या परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षा कधी जाहीर होणार याच्या प्रतीक्षेत होते. तसंच लवकरात लवकर या परीक्षा पार पाडल्या जाव्या अशी मागणीही करण्यात येत होते. दरम्यान, आता मार्च महिन्यात या परीक्षा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसंच परीक्षांची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

सोर्स : लोकमत


MPSC Bharti 2021 – MPSC also the Option of ‘EWS’ 

MPSC Bharti 2021 – Following the interim suspension of Maratha reservation in the state, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has now provided open or EWS option to the candidates in the ‘SEBC’ category in the recruitment examinations. Accordingly, the candidates have to change their options through the online system of MPSC till January 15, the information has been published by MPSC.

MPSC साठीही आता ‘EWS’चा पर्याय – जाणून घ्या!

MPSC Bharti 2021 – reservation in SEBC for maratha candidates in MPSC exams too : राज्यात मराठा आरक्षणाला अंतिरम स्थगिती मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ नुसार आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकारकडून वेळोवेळी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संबंधित विभागांच्या मागणीनुसार ‘एमपीएससी’मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी पदे आरक्षित दर्शविण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना सरळसेवा भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव (खुला) किंवा ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेण्याबाबतचा पर्याय ‘एमपीएससी’ने उपलब्ध करून दिला आहे.

या परीक्षांसाठी पर्याय – MPSC Bharti 2021

 • – सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०
 • – राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०
 • – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२०
 • – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०

आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ‘हे’ करा –

 • – आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे १५ जानेवारीपर्यंत संबंधित परीक्षेसाठी अर्जाद्वारे खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, याचा विकल्प देणे आवश्यक.
 • – खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’चा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्यात येईल.
 • – ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार ‘एसईबीसी’ आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.
 • – आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे पर्य़ाय सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

MPSC 2020 Bharti Rajya Seva Purn Seva – MPSC Recruitment 2020-21 official advertisement out for various psc posts. Candidates can now apply online application form here at mahampsc.mahaonline.gov.in OR www.mpsc.gov.in. Maharashtra Public Service Commission out various notification for feeling upto 200 vacancies for Maharashtra Combined state civil service prelims Examination 2020, various Posts vacancy. Below we share notification, posts detail, vacancy, syllabus, result, more updates.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.

जे उमेदवार सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत ते महाराष्ट्र एमपीएससी परीक्षेत सहभागी होऊन आपल्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. यासाठी उमेदवारांना 13.01.2020 पूर्वी अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्जदार पदवीधारक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय कमीतकमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष हवे.

 • पदाचे नाव – सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी, उद्योग उप संचालक – तांत्रिक, सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, नायब तहसीलदार
 • पद संख्या – २०० जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
 • फीस – अमागास उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


MPSC 2021 Bharti @ mpsc.gov.in

MPSC Recruitment 2020 Rajya Seva Pariksha 2020  advertisement is published today at mpsc.gov.in. The MPSC 2020 Timetable is already published on MahaBharti.in. There are total 200 vacancies under this bharti process. The Online Registration forms are now available Online. The last date to submit your application Form is 13th Jan 2020. This Recruitment process is For the post of the  Assistant State Tax Commissioner, Deputy Chief Executive Officer/ Group Development Officer, Assistant Commissioner/ Project Officer, Deputy Director of Industry, Assistant Director, Deputy Education Officer, Section Officer, Assistant Group Development Officer, Assistant Registrar, Deputy Superintendent, Assistant Commissioner, Skill Development, Employment & Industrial Guidance officer, Assistant Project Officer/ Research Officer & Equivalent & Nayab Tahasildar. The Registration is through the MPSC Portal. The Candidates should be Passed with Degree Course. More details about MPSC Bharti 2020 are given below. Also read the Official advertisement for more details.

MPSC Pre Exam 2020 – mpsc.gov.in 

Department Name
Maharashtra Public Service Commission
Recruitment Name
MPSC Recruitment Rajya Seva Purn pariksha 2020
Name of Posts Assistant State Tax Commissioner, Deputy Chief Executive Officer/ Group Development Officer, Assistant Commissioner/ Project Officer, Deputy Director of Industry, Assistant Director, Deputy Education Officer, Section Officer, Assistant Group Development Officer, Assistant Registrar, Deputy Superintendent, Assistant Commissioner, Skill Development, Employment & Industrial Guidance officer, Assistant Project Officer/ Research Officer & Equivalent & Nayab Tahasildar
Total Vacancies 200 Posts
Application Mode MPSC Pre Exam 2020 Online Application Forms Through www.mpsc.gov.in
Official Website mpsc.gov.in

Eligibility  For MPSC Recruitment 2020

Educational Qualification Any Degree ( Read PDF For Details)
Age Limit 19 years to 38 years [Reserved Category: 05 years Relaxation]

MPSC Bharti Vacancy Details

Assistant State Tax Commissioner 10 Posts
Deputy Chief Executive Officer / Group Development Officer 7 Posts
Assistant Commissioner / Project Officer 1 Post
Deputy Director of Industry, Technical 1 Post
Assistant Director 2 Posts
Deputy Education Officer 25 Posts
Section Officer 25 Posts
Assistant Group Development Officer 12 Posts
Assistant Registrar 19 Posts
Deputy Superintendent 9 Posts
Assistant Commissioner, State Excise Duty 1 Post
Skill Development, Employment & Industrial Guidance officer  4 Posts
Assistant Project Officer / Research Officer & Equivalent 11 Posts
Nayab Tahasildar 73 Posts

Application Fees For MPSC Recruitment 2020

For General category Rs.524/-
For Reserve category Rs.324/-

Important Dates of MPSC Bharti 2020

Starting Date For Online Application 23-12-2019
Last Date For Online Application 13-01-2020

How to Apply MPSC Bharti 2020 

Maharashtra Public Service Commission (MPSC) would conduct the Civil Service exam to select candidates for various various state service departments of Administration, Police, Finance etc. in group A and B services in the Maharashtra government. The Application process of MPSC Bharti 2020 details are given here.  In addition to managing matters related to recruitment, the Commission also decides the suitability of candidates for appointment to the services through promotions, deputations, nominations and transfers.

Previous year, a total of 431 vacancies were notified under the MPSC Civil Service Exam. Out of the total number of candidates who took the exam, 7040 candidates had qualified for the main exam of MPSC. The main examination for qualified candidates was held on 13, 14 and 15 July at exam centres in Aurangabad, Mumbai, Nagpur, and Pune.

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment