MPSC Preparation 2021| MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे.

सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु

अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ नका, हे राहीलं ते राहील या अस्वस्थेतुन बाहेर या,

प्रत्यक्ष पेपरच्या 18 तास आधी अभ्यास बंद करायला हवा, मेंदुला पुर्णतः शांताता‌ द्यावी, आदल्या रात्री अस्वस्थ वाटणे नैसर्गिक आहे पण पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

वेळेवर परिक्षा केंद्रावर पोहचा, आपला आसन क्रमांक आणि बैठक व्यवस्था याची खात्री करुनच आसनस्थ व्हा. आधार , हाॅल तिकिट आणि हजेरी प्रक्रिया अचुक पुर्ण करा.

सामान्य अध्ययन पेपर 1 आणि 2 साठी कोणतेही पुर्व‌ग्रह मत तयार करुन ठेवु नका, पेपर असाच येईल, मी असं करेन, तसं करेन….. याउलट “पेपर जसा येईल तसा मी उत्तम प्रतिसाद देईल” ही मानसिकता तयार ठेवा

सामान्य अध्ययन पेपर 1 –
1.प्रश्नपत्रिकेतील सर्व पाने प्रींट आहेत का? प्रश्न विषय समुहानुसार कसे टाकले आहेत? दीर्घ पर्यायी आहेत की लघु पर्यायी/वनलाईनर ..? याची खातरजमा सुरवातीलाच कमीत कमी वेळात करुन घ्या

2.विविध विषयांचे प्रश्नसमुह पेपर मध्ये उलटसुलट टाकलेले असतात, बर्याच दा पेपरचा पहिला प्रश्न अवघड असु शकतो, त्यामुळे सुरवात आपल्याला आवडत्या विषयांच्या प्रश्नसमुहापासुन केली तरी चालेल परंतु त्या संबंधित क्रमांकाच्या समोरच गोळा करावा आणि न चुकता सगळे प्रश्र्न सोडवावेत.

3.अर्धा मिनिटांत प्रश्न वाचुन प्रश्न व्यवस्थित समजून घेणे , सुटणार असेल तरच सोडविणे अन्यथा लगेच पुढच्या प्रश्नावर जाणे. पेपर सोडविताना A,B,C&D राऊंड वापरता येईल

4. पेपरच्या काठिण्य पातळी नुसार जास्तीत जास्त प्रश्र्न अटेम्ट करा.जास्तीत जास्त प्रश्र्न अचुक सोडविण्याचा प्रयत्न करा.

5. प्रश्र्न सुटल्यावर लगेच त्याच क्रमांकासमोर गोळा करुन ठेवा, आणि प्रश्नपत्रिकेमध्ये‌ प्रश्न सोडविण्याची खुण करुन ठेवा. गोळे करण्याचे काम शेवटी ठेवणे धोक्याचे ठरु शकते. गुण सुरक्षित करत करत पुढे जात राहणे नेहमी योग्य.

अंदाजपंचे/गोळीबार – तांत्रिक दृष्ट्या तुमच्या अटेम्ट प्रश्नसंख्येच्या 10% प्रश्र्न गोळा करण्याची रिस्क घेतली पाहिजे उदाहरणार्थ. GS 1 मध्ये 80 प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर अजुन कंन्फ्युन असणारे 8 प्रश्र्न सोडविण्याची रिस्क घेता येते. अचुकतेनुसार जास्तीत जास्त अटेम्ट ठेवा. (आपापल्या सोयीनुसार अनुसरून करावे)

दोन पेपरच्या मधील रिकाम्या वेळेत शांत रहा, पेपर 1 कसा ही गेला असेल त्यावर विचार करु नका, कट आॅफ किती लागेल..?,अमुक प्रश्र्न बरोबर आहे की चुकलाय..? खुप चांगला/वाईट स्कोर येणार आहे..?इत्यादी कोणत्याही प्रकारचा सकारात्मक/नकारात्मक विचार प्रवाहात न अडकता न्युट्रल/तटस्थ रहा. सीसॅट‌ साठी लागणारी सुत्रे, प्रश्र्न सोडविण्याची पद्धती इत्यादी गोष्टींची उजळणी करा.

सामान्य अध्ययन पेपर 2(CSAT) –
1.निर्णय क्षमता प्रश्नाला नकारात्मक गुण पद्धती नसते, त्यामुळे आधी ते सोडवुन घ्यावेत. किंवा तुमच्या नियोजनानुसार त्यातील चारही पर्यायांचा चतुरस्त्र विचार करुनच निर्णय घ्यावा.

2. सीसॅट पेपर ला एकाग्रता खुपच महत्वाची आहे, त्यामुळे दोन‌ तासांत पेपरमधील प्रश्नां ऐवजी येणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका,त्यावर विचार करुन विचारजाल निर्माण करु नका, येणारे विचार येउद्या जाणारे विचार जाउद्या, प्रश्र्नांच्या संपूर्ण आकलनावर लक्ष केंद्रीत करा.

3.उतारे,निर्णय क्षमता प्रकारातील प्रश्र्न आणि गणित, बुद्धिमत्ता प्रश्न या दोन‌ भागात स्वतःच्या कम्फर्टनुसार वेळ देऊन अचुकता कायम ठेवावी.

4.अवघड प्रश्नांना आव्हान देऊन वेळखाऊ ट्रप मध्ये अडकु नका, पेपर सोडविताना वेळेवर कायम ध्यान ठेवा, एखादा प्रश्न‌ नाही सुटला तरी इगो दुखावुन घेऊ नका‌ लगेच पुढील प्रश्नाकडे चला.

5. सीसॅटचा पेपर जसा येईल तसा स्विकारा, सोपा आला तर अतिउत्साह नको किंवा अवघड आला तरी मनोधैर्य खच्चीकरण नको. दोन तासात जास्तीत जास्त प्रश्न अचुक सोडविण्याचा प्रयत्न करा.

“पुर्व परिक्षेला काठिण्य पातळी, सोडविण्याचा वेग आणि अटेम्ट प्रश्नसंख्या यांचा परस्पर प्रत्यक्ष संबंध असतो, पेपर कठिण(CSAT 2015) आला तर वेग मंदावतो, कमी प्रश्र्न अटेम्ट होतात याविरुद्ध पेपर सोपा(CSAT2018) आला तर वेग वाढतो ,आणि जास्तीत जास्त प्रश्र्न अटेम्ट होतात ” ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पेपर सोडवताना काठिण्यपातळी नुसार तुम्ही वेग आणि प्रश्नसंख्या अटेम्ट ठरविला पाहिजे.

स्वतःला सांगा –
“माझा सर्व अभ्यास झाला आहे, जे मी वाचलंय त्यातुनच प्रश्न येणार आहेत, नाही आले तरी माझ्या अभ्यासातुन ते हमखास सुटतील” अनपेक्षित प्रश्नांना कुशलतेने हाताळण्यास मी तयार आहे, मी माझ्या सदसद्विवेकबुद्धी आणि अभ्यास या आधारे अनपेक्षित प्रश्न ही सोडवेन
“पुर्व मला फक्त क्वाॅलिफाय करायची आहे,मला कोणते प्रश्न सोडवायचे आहेत आणि कोणते सोडायचे आहेत याबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. आज पर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर पुढील दोन तासांत मी माझे सर्वात्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे.”

यशाची त्रिसुत्री – साधारणतः पुर्व परिक्षा उत्तीर्ण आणि अनुतीर्ण होण्यार्यामध्ये फक्त 10 ते 20 गुणांचा फरक असतो, पुढील तीन गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर हे गुण नक्कीच वाढतील

A.”प्रश्र्न ‘व्यवस्थित’ वाचणे” सर्वात महत्त्वाचे आहे – चुकणार्या प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न व्यवस्थित वाचुन समजुन न घेतल्यामुळे चुकतात आणि हेच प्रश्न पुर्व परिक्षा अनुतीर्ण होण्यास कारणीभूत ठरतात. प्रश्नामध्ये विचारले काय आहे हे समजुन घेणे महत्त्वाचे आहे त्यासाठी प्रश्र्न किमान दोनदा वाचायला हवा.

B.संक्लपनेचा विचार – प्रश्नातील मुख्य विधानवरच प्रथम विचार करावा, पर्याय न‌ पाहता मुळ विधान प्रश्र्न आणि उपविधान या आधारे उत्तर मनात पक्के करुन घ्या मग पर्यायांवर नजर फिरवा, या मुळे पर्यायी उत्तरांबरोबर चुकीच्या पर्यायामुळे मुळ संकल्पनेपासुन भरकटत नाही आणि गोंधळही होणार नाही.

C.सोपे प्रश्र्न आणि अवघड प्रश्र्नांचे प्रकार शोधुन सोपे प्रश्र्न सोडवुन गुण सुरक्षित करणे आवश्यक आहे,आयोग नेहमीच किचकट आणि अवघड प्रश्र्न विचारते हा भ्रम मनातुन काढुन टाका, प्रश्र्न सोपे असतात , अवघड विचार करून ते अवघड करु नये.

‘राज्यसेवा पुर्व परिक्षा म्हणजे तुमच्यासाठी जीवन नाही, पण मागील काही वर्षांपासून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली “जीवनातील सर्वात्तम संधी” आहे. म्हणुन तीचे सोने करा.”

परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा!!! आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत.

#बाकी_Keep clam & Enjoy MPSC Prelim.

-नितिन बऱ्हाटे
संपर्क – Telegram search @nitinbarhate
(लेखक “लोकनीति IAS” या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक आहेत)

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment