MSBTE Diploma Exam 2021 | MSBTE मार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

MSBTE Diploma Exam 2021 : Diploma examinations conducted by the Maharashtra State Board of Technical Education will be held in July-August. The board has informed that the students will be able to fill up the application by May 12.

MSBTE Diploma Exam 2021 : MSBTE मार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना १२ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.

या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना १२ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे. ‘एमएसबीटीई’मार्फत वेबसाइटवरील स्टुडंट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हा परीक्षा अर्ज भरताना स्वत:चा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये भरलेल्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर परीक्षाविषयक माहिती पाठवली जाणार असल्याने, या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अचूकपणे नमूद कराव्यात.

प्रथम व द्वितीय घटक चाचणी परीक्षा ‘एमसीक्यू’ बेस्ड ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, याबाबतची अधिक माहिती ‘एमएसबीटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment