RTE Admission Details | RTE प्रवेशांबाबतच्या सूचना- उर्वरित प्रवेश प्रक्रिया लॉकडाउननंतरच!

RTE Admission 2020 Details

RTE Admission Details : RTE admissions will take place only after lockdown. Admission instructions for the students whose admission has been declared are given on the RTE Admissions website. Accordingly, the parents of the children whose admission has been declared are required to verify the documents.

RTE प्रवेशांबाबतच्या सूचना- उर्वरित प्रवेश प्रक्रिया लॉकडाउननंतरच! – ‘आरटीई’ प्रवेश लॉकडाउननंतरच होणार आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

‘संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेशप्रक्रिया राबवणे शक्य नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतरच कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.


RTE Admission : शिक्षण संचालनालय सुधारित तारखा जाहीर करणार

RTE Admission Details : The Directorate of Education will announce revised dates for admission to the draw. The state-level draw for 25 percent admission to RTE was taken out on Thursday. The parents had to verify the documents through the department’s verification committee by April 30th.

RTE Admission : शिक्षण संचालनालय सुधारित तारखा जाहीर करणार. आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९नुसार, वंचित गटातील बालकांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या सोडतीचे प्रवेश घेण्यासाठी शिक्षण संचालनालय सुधारित तारखा जाहीर करणार आहे. आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते.

निर्बंध असल्याने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक ९,०८८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


RTE प्रवेशाची सोडत जाहीर – वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के जागांवर प्रवेश

RTE Admission Details : Admission to 25 percent seats in private schools. The release of RTE admissions was announced on Wednesday, April 7. Disadvantaged students are given admission in 25 percent seats in private schools through this draw.

RTE प्रवेशाची सोडत जाहीर – खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेश. आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी ७ एप्रिल रोजी जाहीर झाली. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या सोडतीमार्फत खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होतील.

आरईटीई प्रवेश तपशील

  • एकूण शाळा – ९,४३२
  • प्रवेशक्षमता – ९६,६८४
  • एकूण अर्ज – २,२२,०२८

सोडतीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील, तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे


RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 3 मार्च पासून

RTE Admission Details : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला 3 मार्च पासून सुरुवात होत पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.RTE Admission Details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For RTE Admission Details
pdf PDF जाहिरात : http://bit.ly/3b5qgVm

RTE Admission 2020 Apply Online : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.

त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.


बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार असून प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी करावी लागणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या 25 टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचे असून, आणि मार्चला सोडतीद्वारे प्रवेश जाहीर केले जाणार आहेत. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला (www.MahaBharti.in) भेट देत रहावी.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ही माहिती देण्यात आली. नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी जानेवारी 21 ते 6 फेब्रुवारी दरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल.

सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि शाळेत जाऊन प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 16 मार्च ते 3 एप्रिल अशी मुदत आहे. त्यानंतर 13 एप्रिल ते 22 मे या कालावधीत प्रतीक्षा यादीतील विद्याथ्रयांना चार टप्प्यांत प्रवेश दिले जातील. या वर्षी एकच लॉटरी काढली जाणार असून, शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी. त्यामुळे नंतर धावपळ उडणार नाही. प्रवेशासाठी आधी शासनमान्यता प्राप्त शाळांची व उपलब्ध जागांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

“आरटीई“ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळविण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. त्यास शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. प्रवेशाबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यासाठी प्राथमिक बैठका सुरू झाल्या आहेत. येत्या 16 जानेवारी रोजी “एनआयसी’तील अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून यात प्रवेशाचे वेळापत्रक, पूर्वतयारी, तांत्रिक अडचणींवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

दरवर्षी प्रवेशासाठी तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येत होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया शाळा सुरू झाल्या तरी चालूच राहत होती. मागील वर्षात प्रवेशासाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य शाळांमधील प्रवेशाच्या जागा रिक्‍तच पडल्या होत्या. आता मात्र एकादाच लॉटरी काढण्यात येणार आहे. उपलब्ध जागांसाठी लॉटरी काढून त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी मुदत देण्यात येणार आहे. जेवढ्या उपलब्ध जागा आहेत तेवढ्या जागांसाठी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. लॉटरीतील प्रवेशाच्या जागा रिक्‍त राहिल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. येत्या मे अखेरपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही शासनाकडून जारी करण्यात आले आहे.

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment